… तोपर्यंत सरकार कसं पडेल? तुम्ही तर ताटाखालचं मांजर, संजय राऊत यांचा रोख नेमका कुणावर?
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी होत आहे. या सुनावणीआधी संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवलाय. राऊत म्हणाले, बेकायदेशीर सरकार वाचवण्यासाठी विधानसभा अध्यक्षपदावर बेकायदेशीर सरकारला संरक्षण देणारी व्यक्ती बसली
मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३ : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी होत आहे. या सुनावणीआधी संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवलाय. राऊत म्हणाले, बेकायदेशीर सरकार वाचवण्यासाठी विधानसभा अध्यक्षपदावर बेकायदेशीर सरकारला संरक्षण देणारी व्यक्ती बसली आहे. हे सरकार पडणार नाही, असं वारंवार सांगितलं जातंय, हे सांगणं तुमचं काम आहे का? असा सवाल करत संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगंलच फटकारलं आहे. तर जोपर्यंत तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालची मांजरं बनून त्या खुर्चीवर बसलेली आहेत. तो पर्यंत सरकार कसं पडेल? असा हल्लाबोल करत संजय राऊत म्हणाले, तुम्ही बेकायदेशीर सरकारचं संरक्षक म्हणून काम करत आहात तुम्ही घटनात्मक काम करत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणसांचा आत्मविश्वास वाढतो. तो विधानसभा अध्यक्षपदावर बसलेल्या अशा व्यक्तींमुळे…असे भाष्य करत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.