यंत्रणाचा गैरवापर करून विजय मिळवला; महाडिकांच्या विजयानंतर संजय राऊतांची भाजपावर टीका
राज्यसभा निवडणुकीत धनंजय माहाडिक यांचा विजय झाला आहे. हा विजय यंत्रणांचा गैरवापर करून मिळवला असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. या विजयानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा विजय म्हणजे यंत्रणाचा गैरवापर करून मिळवलेला विजय आहे. आमची ज्या पद्धतीने मते बाद करण्यात आली, ते पहाता यंत्रणाचा गैरवापर झाला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. महाडिकांना शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजेच संजय राऊत यांच्यापेक्षा अधिक मते मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Published on: Jun 11, 2022 09:55 AM