Sanjay Raut : 2024 ला जनता माज अन् मस्ती उतरवणार, संजय राऊत यांनी नाव न घेता केला हल्लाबोल
VIDEO | संजय राऊत यांची आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका, एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यावरही त्यांचं मुख्यमंत्रिपद टिकवणार आहे, यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. पण मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही...
पुणे, २९ ऑक्टोबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी विधान परिषदेवर येणार आणि मुख्यमंत्रीच राहणार, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री शिंदेंच्या अपात्रतेवरुनही फडणवीसांनी TV9 च्या मुलाखतीत मोठा खुलासा करत शिंदेंच्या अपात्रतेवरुन फडणवीसांनी भाजपचा प्लॅन बी सांगितला आहे. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ‘एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यावरही त्यांचं मुख्यमंत्रिपद टिकवणार आहे, यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. पण मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही’, असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर एकनाथ शिंदे अपात्र झाले तरी त्यांना विधानपरिषदेवर घेऊ आणि त्यांचं मुख्यमंत्री पद टिकवू, असं गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही कसली मस्ती आहे. याला माज म्हणतात. ही मस्ती अन् माज जनता २०२४ ला उतरवणार असल्याचे म्हणत राऊतांनी हल्लाबोल केलाय.