... पण गेलेली अब्रू झाकली जाणार? उलट 'बुडत्याचा पाय खोलात'; सामनातून केंद्रावर निशाणा काय?

… पण गेलेली अब्रू झाकली जाणार? उलट ‘बुडत्याचा पाय खोलात’; सामनातून केंद्रावर निशाणा काय?

| Updated on: Dec 20, 2023 | 12:18 PM

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर खासदार निलंबन प्रकरणावरून केंद्रावर हल्लाबोलही करण्यात आलाय. तर सरकारची गेलेली अब्रू झाकली जाणार नाही, असा खोचक टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

मुंबई, २० डिसेंबर २०२३ : केंद्रातील पळपुटे सरकार कर्तव्यापासून पळ काढत आहे, असं म्हणत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर खासदार निलंबन प्रकरणावरून केंद्रावर हल्लाबोलही करण्यात आलाय. तर सरकारची गेलेली अब्रू झाकली जाणार नाही, असा खोचक टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे. हुकूमशाहीचा कडेलोट आणि बुडत्याचा पाय खोलात… या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आलाय. संसदेवरील ‘स्मोक हल्ला’प्रकरणी सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र केंद्रातील पळपुटे सरकार या कर्तव्यापासून स्वतःही पळ काढत आहे आणि विरोधी खासदारांचे निलंबन करून त्यांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यापासून रोखत आहे. मात्र त्यामुळे तुमची गेलेली अब्रू झाकली जाणार नाही. उलट ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशीच तुमची अवस्था होणार आहे. विरोधी खासदारांचे सरसकट निलंबन हा मोदी सरकारच्या हुकूमशाही कारभाराचा कडेलोट आहे, असे सामनातून म्हटले आहे.

Published on: Dec 20, 2023 12:15 PM