संजय राऊतांची कोठडी आणखी वाढणार..?
आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत असले तरी त्यानी आज कोणत्याही प्रकारचा जामीनासाठी अर्ज केल्याचे दिसून आले. त्यामुळे संजय राऊत यांच्याबद्दल न्यायालय काय बाजू घेणार हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, त्यानंतर आज त्यांना त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे. जे. रुग्मालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना आजच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे. संजय राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी संपली असून ही पहिली न्यायालयीन कोठडी संपली असली तरी राऊत यांनी अजून जामिनासाठी अर्ज केला नाही मात्र आज ते जामिनासाठी अर्ज करु शकतात याची दाट शक्यता आहे. ईडीकडून त्यांना अटक करण्यात आल्यानंतर आठ दिवस त्यांनी ईडी कोठडी देण्यात आली होती, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत असले तरी त्यानी आज कोणत्याही प्रकारचा जामीनासाठी अर्ज केल्याचे दिसून आले. त्यामुळे संजय राऊत यांच्याबद्दल न्यायालय काय बाजू घेणार हे आता निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
Published on: Aug 22, 2022 12:14 PM