कसा असेल आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा? संजय राऊतांनी सांगितला प्लॅन

कसा असेल आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा? संजय राऊतांनी सांगितला प्लॅन

| Updated on: Jun 14, 2022 | 1:21 PM

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उद्या (15 जून) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या दुपारी दोन वाजता त्यांचं अयोध्येत आगमन होईल.

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उद्या (15 जून) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या दुपारी दोन वाजता त्यांचं अयोध्येत आगमन होईल. सकाळी 11 वाजता ते लखनऊ एअरपोर्टवर पोहोचतील आणि तिथून ते थेट अयोध्येला रवाना होतील. रामनगरमधील इस्कॉन मंदिरालाही ते भेट देणार आहेत. हा कार्यक्रम आधीच नियोजित होता, असं संजय राऊत म्हणाले. तिथून हॉटेल पंचशीलला जातील आणि दुपारी 3.30 वाजता त्यांची पत्रकार परिषद असेल. तत्पूर्वी आज राज्यभरातून हजारो शिवसैनिक आणि युवासैनिक अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. ठाण्यातील शिवसैनिकही आज अयोध्या स्पेशल ट्रेननं अयोध्येसाठी रवाना झाले आहेत.

Published on: Jun 14, 2022 01:21 PM