2024 नंतर शिंदे गटाचे काय ‘या’ प्रश्नावर संजय राऊत यांनी दिले ‘हे’ उदाहरण
समोर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आहेत. त्यांना सोडून कुठे जाणार नाही. कारण इथे निष्ठेच्या शपथा घेतल्या जातात त्या आनंद दिघे साहेब यांच्या नावाने.
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे की शिवसेनेचे ठाणे हा प्रश्नच नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांना याच ठाण्याने पहिली सत्ता दिली होती. आजपर्यत ठाणे अबाधित आहे. ठाण्यातील काही जण इकडे तिकडे गेले. पण शिवसैनिक आहे तिथेच आहे. शिवसेना जागेवरच आहे. ठाण्यात जास्त उत्साह दिसतो आहे. समोर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आहेत. त्यांना सोडून कुठे जाणार नाही. कारण इथे निष्ठेच्या शपथा घेतल्या जातात त्या आनंद दिघे साहेब यांच्या नावाने. ठाण्याची घोडदौड अशीच सुरु राहील. काहींनी मला तुरुंगात टाकले होते. पण, या सगळ्यांना पुरून उरणार आहे. जे कुणी इकडे तिकडे गेले ते पावसाळा आला की बेडूक दिसू लागतात तसे आहेत. पावसाळा संपला की बेडकं गायब होतात तसे 2024 नंतर इकडे तिकडे गेलेले कुणी दिसणार नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना लगावला.