संजय राऊत म्हणताय… मी सुरक्षा मागितलेली नाही, मी एकटा वाघ आहे
VIDEO | ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काय केले खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप? बघा व्हिडीओ
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्वतःवर हल्ला होईल, अशी भीती व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ल्याचा कट आखल्याचा संजय राऊत यांनी पत्रात दावा केला आहे. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे यांनी माझ्या हल्ल्याची जबाबदारी एका गुंडाला दिली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात नवं सरकार आलं. या सत्तांतरानंतर माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे काढून घेण्यात आली आहे. अशा स्थितीत माझ्या जीवितास धोका असल्याची भीती राऊत यांनी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात मी सुरक्षा मागितली नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही लाचार नाही, सुरक्षा नाही दिली तरी चालेल असे म्हणत आणखी काय म्हणाले राऊत बघा…