‘आराम करायला मुख्यमंत्री झाला आहात का?’, शिंदे यांचा कोणी चिमटा काढत केलीय टीका?
यावरून सध्या अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांची तब्बेत बिघडल्याने ते हवा पालटासाठी त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावी गेले आहेत. तेथे ते आराम करत आहेत. याचदरम्यान तब्बेत बिघडल्याने शिंदे यांना जबरदस्ती रुग्णालयात दाखल करणार असल्याचं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं.
मुंबई, 13 ऑगस्ट 2023 | राज्याच्या गृहविभागातील पोलिस दलास यावेळी एक देखील केंद्रीय गृह विभागाचे पदक मिळालेलं नाही. यावरून सध्या अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांची तब्बेत बिघडल्याने ते हवा पालटासाठी त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावी गेले आहेत. तेथे ते आराम करत आहेत. याचदरम्यान तब्बेत बिघडल्याने शिंदे यांना जबरदस्ती रुग्णालयात दाखल करणार असल्याचं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय. यावेळी राऊत यांनी, मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली हे मला कळलं. ते आराम करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती आराम करत आहेत? उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्याने आपण राज्यकारभार करायला मुख्यमंत्री झालो आहोत की आराम करायला याचा विचार करायला हवा. आजच वाचलं आरामाला गेले आहेत. करू द्या, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.