‘सरकार आल्यापासून राज्यात मृत्यूचं तांडव’; राऊत यांचा शिंदे सरकारवर घणाघाती टीका
या घटनेनं राज्याच्या आरोग्य सेवेत एकच खळबळ उडाली असून एका आठवड्यात तब्बत 22 रूग्णांचा मृत्यू या रुग्णालयात झाला आहे. त्यामुळे सध्या ठाकरे गटासह महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडून सरकारवर निशाना साधला जातोय.
मुंबई, 14 ऑगस्ट 2023 | ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनं राज्याच्या आरोग्य सेवेत एकच खळबळ उडाली असून एका आठवड्यात तब्बत 22 रूग्णांचा मृत्यू या रुग्णालयात झाला आहे. त्यामुळे सध्या ठाकरे गटासह महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडून सरकारवर निशाना साधला जातोय. यावेळी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप आणि भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर टीका केलीय. त्यांनी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अशा दुर्घटना होत आहेत. समृद्धी महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरूच असून येथे एका बस अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह असाताना उष्माघातानं 12 जणांचा मृत्यू झाला आणि आता ही रूग्णालयातील घटना ज्यात 18 रुग्णांचा मृत्यू झाला अशी टीका केलीय.