VIDEO : Breaking | मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावर पवार नाराज? राऊत थेट ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादमधील कार्यक्रमात भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली होती. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आलो तर भावी सहकारी असा उल्लेख केला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादमधील कार्यक्रमात भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली होती. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आलो तर भावी सहकारी असा उल्लेख केला होता. मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ गुगलींने सगळेच अवाक् झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर महाविकास आघाडीत पडसाद उमटत असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीमध्ये नापसंती असल्याची चर्चा आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा काही निरोप घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
Latest Videos