बावनकुळे यांच्या टीकेला राऊत यांच्याकडून ईंट का जवाब पत्थर से; सडकून टीका करत म्हणाले, ‘वाचनात ठणठणाट’

बावनकुळे यांच्या टीकेला राऊत यांच्याकडून ईंट का जवाब पत्थर से; सडकून टीका करत म्हणाले, ‘वाचनात ठणठणाट’

| Updated on: Aug 20, 2023 | 1:20 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखावरून जोरदार टीका केली होती. तसेच या अग्रलेखाविरोधात न्यायालयात जाऊ असं म्हटलं होतं

मुंबई | 20 ऑगस्ट 2023 : दैनिक सामनाच्या कालच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका करण्यात आली होती. त्यामुळे भाजप आता चांगलीच आक्रमक झाली आहे. तर भाजपकडून जोरदार आंदोलन केलं जात आहे. याचे आजही पडसाद उमटले. मात्र याच्या आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखावरून इशारा दिला. त्यांनी याविरोधात न्यायालयात जाऊ असे म्हटलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टोली लगावला आहे. तर बावनकुळे आणि भाजपच्या नेत्यांनी सामनाचा अग्रलेख काळजीपूर्वक वाचावा. पण ते वाचणार नाहीत. पण सध्या भाजपचा सगळा वेळ हा कटसारस्थानं, बदला घेण्यातच जात आहे. त्यामुळे त्यांचं वाचन कमी झालं आहे. त्यांनी अग्रलेख व्यवस्थित वाचावा मग बोलावं, असा टोला लगावला आहे. तर बावनकुळे यांच्यावर टीका करताना, या देशात या राज्यात काय सुरू आहे याची माहिती जरा कमी आहे भाजपडे. त्यामुळे जरा वाचलं पाहिजे. माणसानं वाचलं पाहिजे. समजून घेतलं पाहिजे. पण ते वाचत नाहीत. आणि बावणकुळे यांचा तर वाचनात ठणठणाट आहे. मला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा तो अग्रलेख वाचावा. आणि त्यातून जे परखड सत्य मांडलं आहे ते समजून घ्यावं आणि त्यानंतर एक चांगला वकील घ्यावा.

Published on: Aug 20, 2023 01:20 PM