संजय राऊत यांची ईडीकडून गेल्या 7 तासांपासून चौकशी सुरू
संजय राऊतांच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. कोणत्याही क्षणी संजय राऊत यांची ईडीकडून अटक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संजय राऊतांच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. कोणत्याही क्षणी संजय राऊत यांची ईडीकडून अटक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीकडून संजय राऊतांची गेल्या सात तासांपासून चौकशी सुरू आहे. मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणात ही चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांच्या भांडुपममधल्या मैत्री निवासस्थानी ही चौकशी सध्या सुरू आहे. राऊतांच्या दादरमधील घरीदेखील ईडीचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. ईडीचे दहा अधिकारी सकाळी 7 वाजल्यापासून राऊतांच्या घरी दाखल झाले आहेत. मात्र अद्याप जबाब नोंदवलेला नाही.
Published on: Jul 31, 2022 03:15 PM
Latest Videos