संजय राऊत ही पवारांच्या अमंगल कार्यालयातील करवली... राज ठाकरे यांची जहरी टिका

संजय राऊत ही पवारांच्या अमंगल कार्यालयातील करवली… राज ठाकरे यांची जहरी टिका

| Updated on: Aug 10, 2024 | 2:37 PM

राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर मराठवाडा प्रचार दौऱ्या दरम्यान पुन्हा आपली भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांच्या कारवर बीड येथे सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या.

राज ठाकरे यांनी मराठवाड्यात आपला दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यात असताना मराठा आरक्षणावरुन त्यांनी टिका केल्यानंतर बीड येथे त्यांच्या कारवर सुपारी फेक आंदोलन करण्यात आले होते. त्यावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत वक्तव्य केले आहे. प्रत्येक गरीबाला आरक्षणाची गरज आहे. मराठ्यातील गरीबांना आरक्षण हवे आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलन सुरु असतानाही देखील मी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली होती. संजय राऊत हे शरद पवार यांची सोंगटी आहेत, यांच्या अमंगल कार्यालयातील ती करवली आहेत, त्यामुळे ती आयुष्यभर उंबरठ्यावर राहणार असल्याची टिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.

Published on: Aug 10, 2024 02:36 PM