Sanjay Raut : 58 कोटींचा हिशोब किरीट सोमय्यांनी द्यावा, शिवसेना नेते संजय राऊतांची मागणी
'58 कोटीचा हिशोब द्या. तू हिशोब दिला पाहिजे. उलटा चोर कोतवाल को डाटे,' असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर टीका केलीय. तर मुंबई केंद्रशासित कशी करता येईल याचं प्रेझेंटेशन याच भाजपच्या पाच लोकांनी तयार केलं, असा आरोपही राऊतांनी केलाय.
मुंबई: भाजपचे (bjp) नेते दोन गोष्टीसाठी केंद्रात जातात. खोटे कागद घेऊन केंद्रात जातात. मुंबईला केंद्रशासित करण्याचं त्यांचं फार मोठं षडयंत्रं आहे. त्यांनी केंद्राला एक प्रेझेंटेशन दिलं आहे. मी दाव्यासहीत सांगतो. मुंबईतले (Mmumbai) काही धनिक, काही भाजपचे नेते, बिल्डर यांच्या संगनमताने हे षडयंत्र सुरू आहे. त्यांच नेतृत्व किरीट सोमय्या (kirit somaiya) करत आहे. मुंबई केंद्रशासित कशी करता येईल याचं प्रेझेंटेशन याच भाजपच्या पाच लोकांनी तयार केलं. सर यावेळी बोलताना, मी तुम्हाला या आधी सांगितलं. तुमचे मुलुंडचे महात्मा आहेत. ते सांगत होते 58 कोटीचा हिशोब द्या. तू हिशोब दिला पाहिजे. उलटा चोर कोतवाल को डाटे, तुम्ही नाही म्हणत अमूक कोटी तमूक कोटी तो कुठून हिशोब आणता? विक्रांतच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केले की नाही हा पहिला प्रश्न आहे. ते प्रातिनाधिक होते, सिम्बॉलिक होते, असं सांगत आहेत, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.