Sanjay Raut | संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, शिवसेना पक्षप्रमुखांसोबत खलबतं

Sanjay Raut | संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, शिवसेना पक्षप्रमुखांसोबत खलबतं

| Updated on: Jun 26, 2021 | 2:34 PM

शरद पवारांचा दिल्ली दौरा, तिसरी आघाडीची मोर्चेबांधणी आणि त्यानंतर लगेचच संजय राऊत यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांचा निरोप घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर (Matoshree) दाखल झाले आहेत. संजय राऊत यांनी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहात का असा प्रश्न टीव्ही 9 ने संजय राऊत यांना विचारला. त्यावेळी संजय राऊत म्हणाले, मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. त्या भेटीत वैयक्तिक चर्चा झाली होती. त्यानंतर शरद पवारांचा दिल्ली दौरा, तिसरी आघाडीची मोर्चेबांधणी आणि त्यानंतर लगेचच संजय राऊत यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांचा निरोप घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.