Special Report | राऊतांची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसोबत बैठक; किरीट सोमय्यांवर कारवाई होणार?

Special Report | राऊतांची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसोबत बैठक; किरीट सोमय्यांवर कारवाई होणार?

| Updated on: Feb 17, 2022 | 9:43 PM

दोनच दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर आज संजय राऊत हे आपल्या जवळची फाईल घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गेले होते. तिथे संजय राऊत यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांसोबत बैठक झाली.

मुंबई : दोनच दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर आज संजय राऊत हे आपल्या जवळची फाईल घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी त्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर गेले होते. तिथे संजय राऊत यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांसोबत बैठक झाली. जेव्हा संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पडले तेव्हा या बैठकीबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी वेट अँण्ड वॉच असे म्हटले आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.