Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'... हे भाजपला महागात पडेल', 'सामना'तून औरंगजेबाचं स्टेट्स ठेवल्यानंतर झालेल्या वादावरून भाजपवर हल्लाबोल

‘… हे भाजपला महागात पडेल’, ‘सामना’तून औरंगजेबाचं स्टेट्स ठेवल्यानंतर झालेल्या वादावरून भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Jun 09, 2023 | 8:26 AM

VIDEO | बुडत्यांनी औरंगजेबाचा आधार घेतला, 'सामना'तून भाजपवर हल्लाबोल

मुंबई : औरंगजेबाचं स्टेट्स ठेवल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. यावरूनच आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या नावाने मोर्चे निघत आहेत व आता औरंगजेबास खांद्यावर बसवून हिंदुत्व खतऱ्यात आणल्याच्या आरोळ्या ठोकल्या जात आहेत. गाडलेल्या मुडद्यांमुळे हिंदुत्व खतऱ्यात यावे इतके ते कच्चे व लेचेपेचे नाही. लेचेपेचे आहे ते भाजपचे व मिंध्यांचे राजकारण. सरकार अपात्र ठरत आहे, ते कोसळणार आहे. त्यामुळे बुडत्यास काडीचा आधार तसा या बुडत्यांनी औरंगजेबाचा आधार घेतला असेल तर ते लाजिरवाणेच म्हणावे लागेल. तिकडे मणिपूर पेटले आहे ते यांना विझवता येत नाही. इथे महाराष्ट्र पेटवू पाहत आहेत. हा आगीशी खेळ त्यांना महाग पडेल. तो औरंग्या राहील बाजूला, पेटवापेटवी करणारेच त्या आगीत जळून जातील. हा इशारा आम्ही महाराष्ट्र हितासाठी देऊन ठेवीत आहोत, असे सामना अग्रलेखात म्हटले असून भाजपला इशारा देण्यात आला आहे तर औरंगजेबास महाराष्ट्रात दफन करून सवातीनशे वर्षे होत आली, पण गाडलेल्या औरंग्यास जिवंत करण्याचे उपक्रम महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष करीत आहेत. औरंगजेबावरून कोल्हापुरात दंगल झाली. स्वतःस हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या संघटनांनी रस्त्यावर उतरून राडा केला. हे का? असा सवालही केला आहे.

Published on: Jun 09, 2023 08:26 AM