सूरज चव्हाण ते सुजित पाटकर मुंबईत ईडीचं धाडसत्र, संजय राऊत म्हणतात…
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजित पाटकर तसेच सनदी अधिकारी संजीव जैसवाल यांच्या घरी देखील ईडीचा छापा पडला आहे. ईडीच्या या धाडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजित पाटकर तसेच सनदी अधिकारी संजीव जैसवाल यांच्या घरी देखील ईडीचा छापा पडला आहे. ईडीच्या या धाडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांनी थेट कागदपत्र दाखवत शिंदे-फडणवीस सरकारच्य मंत्र्यावर आरोप केले आहेत. माझ्याकडे पत्र आहे, 20 जूनला मी ईडी मध्ये तक्रार केलेली आहे. मिळालेल्या पत्रानुसार त्यांनी तक्रार फाईल करून घेतली आहे. त्याची पोच पावती त्यांनी मला दिलेली आहे. मी वारंवार सांगत आहे, दादा भुसे यांच्याविरुद्ध १७८ कोटींच्या भ्रष्टाचाराची तक्रार मी दिली आहे.राहुल कुल यांची ५०० कोटीच्या अपहाराची तक्रार मी केली आहे. त्यांचावर काहीही काहीही कारवाई का होत नाही, वारंवार सांगून देखील यांच्यावरती धाडी पडत नाही. अब्दुल सत्तार यांची देखील मी ईडीकडे तक्रार करणार आहे,राधाकृष्ण विखे पाटील यांना कोण वाचवत आहे? याच लोकांवर तुम्ही धाडी का घालत आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.