“महाराष्ट्रात बीआरएसला भाजपचं समर्थन असेल तर ते धोकादायक”, संजय राऊत यांचं सूचक विधान
भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे आपल्या मंत्रिमंडळासह पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
मुंबई : भारत राष्ट्र समिती पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे आपल्या मंत्रिमंडळासह पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी दाखल झाले आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले की, “आम्ही विरोधी पक्ष पाटण्यात जमलो, पण त्यात केसीआर नव्हते. काँग्रेस त्यांचा शत्रू आहे का? ते त्यांनी स्पष्ट केलं आहे. प्रत्येक राज्यातील राजकीय स्थिती वेगळी आहे. तेलंगणात केसीआरसमोर काँग्रेसचं आव्हान आहे. यातून त्यांनी महाराष्ट्रात घुसून राजकारण सुरू केलं आणि त्याला भाजपाचं समर्थन असेल तर ते धोकादायक आहे.”
Published on: Jun 26, 2023 05:00 PM