“या बाई पुन्हा लोकसभेवर जाणार नाहीत; त्यांना बजरंगबली धडा शिकवेल”, संजय राऊत यांची टीका
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून ठाकरे विरुद्ध राणा समर्थक आक्रमक होताना दिसले.राणा समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणा जवळच काही अंतरावर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून ठाकरे विरुद्ध राणा समर्थक आक्रमक होताना दिसले.राणा समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणा जवळच काही अंतरावर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. ते आज बॅनर फाडतायं कारण त्यांच्यामागे सत्ता आणि पोलिस आहे. ही गुंडगिरी झुंडगिरी त्यांनी आम्हाला शिकवू नये. हनुमान चालिसाचं पठण त्यांनी मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा फुटलेला गट जो प्रखर हिंदूत्वाचा विरोध करत होता, त्यांच्या कार्यालयासमोर करावं. अमरावतीमध्ये त्यांना परत निवडणूका लढायच्या आहेत. या बाई परत लोकसभेत जातील याची खात्री नाही. त्यांना बजरंगबलीच धडा शिकवणार आहेत. हनुमानाच्या नावानं जी नौटंकी केली, त्यावर कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रातही धडा मिळेल,” असं राऊत म्हणाले.