विरोधकांच्या बैठकीत शरद पवार गैरहजर राहणार? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं…
आजपासून दोन दिवस बंगळुरूमध्ये देशातल्या विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला आज शरद पवार जाणार नसल्याची चर्चा आहे. यावर ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई, 17 जुलै 2023 | आजपासून दोन दिवस बंगळुरूमध्ये देशातल्या विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवार जाणार आहेत. परंतु, आजच्या बैठकीला शरद पवार जाणार नसल्याची चर्चा आहे. यावर ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मी स्वतः बैठकीला जाणार आहे. शरद पवार यांच्याविषयी संभ्रमाचे वृत्त देण्यात आले की ते येणार नाहीत. पण माझा त्यावर अजिबात विश्वास नाही. कारण, या विरोधकांच्या आघाडीचा चेहरा कोणी असेल तर शरद पवार असतील. आज सकाळी आमची फोनवर चर्चा झाली की. ते म्हणाले की…”, संजय राऊत नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…