Video : झुंडशाहीतून शिंदे-भाजप सरकार स्थापन झालं – संजय राऊत
शिवसेना (shiv sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकमध्ये (Nashik) जोरदार फटकेबाजी करत बंडखोर आमदारांचा समाचार घेतला आहे. शिवसेना जागेवरच आहे. एक, दोन लोक पळून घेले म्हणजे शिवसेना संपली असे म्हणता येणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेत झालेली बंडखोरी हे कृत्रिम वादळ आहे, ही वावटळ दूर होईल शिवसेना पुन्हा एकदा नव्या दमाने उभी राहील असा […]
शिवसेना (shiv sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकमध्ये (Nashik) जोरदार फटकेबाजी करत बंडखोर आमदारांचा समाचार घेतला आहे. शिवसेना जागेवरच आहे. एक, दोन लोक पळून घेले म्हणजे शिवसेना संपली असे म्हणता येणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेनेत झालेली बंडखोरी हे कृत्रिम वादळ आहे, ही वावटळ दूर होईल शिवसेना पुन्हा एकदा नव्या दमाने उभी राहील असा विश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेला काहीही फरक पडला नाही. मालेगाव, नांदगाव इथले कार्यकर्ते मला भेटून गेले. नाशिक महापालिकेत शिवसेनेचीच सत्ता येईल. मात्र ज्यांनी शिवसेना सोडली ते परत कधीही निवडून येणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. यावेळी संजय राऊत यांनी नव्या सरकारवर देखील निशाणा साधला आहे. ही सत्ता कायदेशीररित्या स्थापन झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Published on: Jul 08, 2022 01:08 PM
Latest Videos