संजय राऊत दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर, शिरुरमध्ये शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत

संजय राऊत दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर, शिरुरमध्ये शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत

| Updated on: Sep 04, 2021 | 12:23 PM

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. संजय राऊत शिरुर लोकसभा मतदारसंघात दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील देखील उपस्थित होते.

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. संजय राऊत शिरुर लोकसभा मतदारसंघात दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील देखील उपस्थित होते. संजय राऊत शिरुर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या कामकाजाचा ते आढावा घेणार आहेत. यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटलांचा शिवसेना मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. बैलगाडा शर्यतीसाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो मात्र कधी पेपरात बातमी दिली नाही. महाराष्ट्रात एखादी जागा कमी आली तरी चालेल मात्र पुढच्या विधानसभा निवडणुकीत जुन्नरचा आमदारा शिवसेनेचाच झाला पाहिजे. शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागण्याचे कार्यकर्त्या़ना आदेश आढळराव पाटील यांनी दिले.