Sanjay Raut : संजय राऊतांचं पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र, ट्विटच्या माध्यमातून पुन्हा डिवचलं
शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष सर्वश्रृत आहे. मात्र, आता संघर्षाची नवा अंक सुरू झाल्याचं दिसतंय
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधडलाय. यावेळी त्यांनी ट्विटकरून (Tweet) पुन्हा एकदा भाजपवर (BJP) टीकास्त्र सोडलंय. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, ‘झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं! बाझ की उडान मे कभी आवाज नही होती..!! जय महाराष्ट्र..!!!’ सध्या राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) मतदान सुरू आहे. यासाठी आमदार मतदानासाठी विधिमंडळात आले आहेत. यातच राऊत यांनी भाजपवर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधलाय. शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष सर्वश्रृत आहे. मात्र, आता संघर्षाची नवा अंक सुरू झाल्याचं दिसतंय. राज्यसभा निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वार-पलटवारही सुरू आहेत. दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होत असल्याचाही आरोप मागे करण्यात आलाय.
Published on: Jun 10, 2022 12:11 PM
Latest Videos