Sanjay Raut : अजित पवार यांच्यावर केलेल्या ‘त्या’ आरोपांनंतर संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल
VIDEO | पुण्यातील येरवड्यातील पोलिसांच्या जमिनीच्या लिलावाचा दादांनी निर्णय घेतला होता, माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून फडणवीसांने सवाल केलाय.
मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३ | पुण्यातील येरवड्यातील पोलिसांच्या जमिनीच्या लिलावाचा दादांनी निर्णय घेतला होता, माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मॅडम कमिशनर या पुस्तकातून मीरा बोरवणकर यांच्याकडून हे गंभीर आरोप करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. २०१० सालच्या प्रकरणाचा या पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, मीरा बोरवणकर यांच्या आरोपांनंतर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस आणि तपास यंत्रणा आता काय कारवाई करणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी कुणासोबत सत्ता स्थापन केली, याचा विचार करावा असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
Published on: Oct 15, 2023 02:04 PM
Latest Videos