3 पक्षांमधील जवळीकेवर Sanjay Raut म्हणतात, बघ माझी आठवण येते का?
कधी रोखठोक बोलण्यातून, कधी धारदार लेखणीतून तर कधी ट्विटवरवरील शायरीतून भाजपची पिसे काढणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊतांनी आज चक्क कवितेतून भाजपवर हल्लाबोल चढवला. राऊतांच्या या कवितेला संपूर्ण सभागृहाने डोक्यावर घेतलंच, पण खुद्द शरद पवारांनाही मिष्किल हसत या कवितेला दाद दिली.
कधी रोखठोक बोलण्यातून, कधी धारदार लेखणीतून तर कधी ट्विटवरवरील शायरीतून भाजपची पिसे काढणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊतांनी आज चक्क कवितेतून भाजपवर हल्लाबोल चढवला. राऊतांच्या या कवितेला संपूर्ण सभागृहाने डोक्यावर घेतलंच, पण खुद्द शरद पवारांनाही मिष्किल हसत या कवितेला दाद दिली. निमित्त होतं, नेमकचि बोलणे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज नेमकचि बोलणे या त्यांच्या भाषण संग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार भाषण करत भाजपवर हल्ला चढवला. यावेळी राऊतांनी प्रसिद्ध कवी किशोर कदम यांची कविता सादर करून भाजपला जोरदार टोले लगावले. राऊत यांनी म्हटलेल्या या कवितेला सर्वांनीच हसून दाद दिली.
हशा, टाळ्या आणि खसखस
मुसळधार पाऊस खिडकीत उभा राहून पाहा… खिडकीत उभी राहून पाहा… बघ माझी आठवण येते का? (आता आम्हाला तीन पक्षाला रोज एकमेकांची आठवण येते म्हणून मला ही कविता आठवली)
हात लांबव… (आम्ही तिघांनी हात लांबच केलेत एकमेकांसाठी)
हात लांबव, तळहातावर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक… बघ माझी आठवण येते का?…
अशी कविता राऊतांनी म्हणताच एकच खसखस पिकली. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून कवितेला प्रतिसाद दिला. तर शरद पवार यांनी हसून या कवितेला दाद दिली.