Saamana | इंदिराजींचं अस्तित्व पुन्हा एकदा दिसलं, सामनाच्या रोखठोकमधून प्रियंका गांधींचं कौतुक

Saamana | इंदिराजींचं अस्तित्व पुन्हा एकदा दिसलं, सामनाच्या रोखठोकमधून प्रियंका गांधींचं कौतुक

| Updated on: Oct 10, 2021 | 8:37 AM

इंदिराजींचं अस्तित्व पुन्हा एकदा दिसलं, सामनाच्या रोखठोकमधून प्रियंका गांधींचं कौतुक. शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतला संवाद त्यांनी आजच्या सामनाच्या रोखठोक सदरात लिहिला आहे.

इंदिराजींचं अस्तित्व पुन्हा एकदा दिसलं, सामनाच्या रोखठोकमधून प्रियंका गांधींचं कौतुक. शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतला संवाद त्यांनी आजच्या सामनाच्या रोखठोक सदरात लिहिला आहे. यावेळी संवादादरम्यान राऊतांनी राहुल गांधींना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे देताना राहुल गांधींनी रोखठोक मतं व्यक्त केली. या चर्चेत दोन्ही नेत्यांमध्ये लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेशमधलं राजकारण, राष्ट्रीय राजकारण, पंजाबमधली राजकीय उलथापालथ अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.

मंगळवारी दुपारी मी दिल्लीत राहुल गांधीं यांना भेटले. 12, तुघलक लेन हे त्यांचे निवासस्थान. राहुल गांधी लाल रंगाचे टी-शर्ट व पायजमा अशा साध्या वेशात गप्पा मारत होते. ‘या लोकांनी देशात काय चालवले आहे पाहा.’ अशी सुरुवात राहुल गांधी यांनी केली. ‘यह लोक लोकतंत्र को पुरी तरह से खतम करने जा रहे है। लेकीन हम लढेंगे!’ हे त्यांचं पुढचे विधान अधिक महत्त्वाचे. प्रियंका गांधी तुरुंगात होत्या व उत्तर प्रदेश सरकारने राहुल यांच्या या बहिणीस 36 तास बेकायदेशीरपणे डांबून ठेवले. ‘आप चिंता मत करिये,’ असे मी म्हणताच, ‘हम जेल की चिंता नही करेंगे। प्रियंका में हिम्मत है। मी उद्याच लखनौला निघतोय. मला अटक झाली तरी हरकत नाही,’ असे राहुल गांधी म्हणाले.