Sanjay Raut On Ashish Shelar : आशिष शेलार राजीनामा देणार? मर्दाच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा पलटवार
'उद्धव ठाकरे तुम्ही जर मर्दाचा पक्ष चालवत असाल आणि त्यांचं तुम्ही नेतृत्व करत असाल तर माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे, भाजप देशात ५४ वर गेली तर उद्धव ठाकरे तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो....', आशिष शेलार यांनी केलेल्या या वक्तव्यावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर काय?
राज्यात जर महाविकास आघाडीच्या १८ जागा आल्या तर राजकारण सोडणार, असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केलं होतं. दरम्यान, आज आशिष शेलार यांचं हेच जुनं वक्तव्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. लोकच संन्यासाला पाठवतात असं म्हणत संजय राऊत यांनी आशिष शेलारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘उद्धव ठाकरे तुम्ही जर मर्दाचा पक्ष चालवत असाल आणि त्यांचं तुम्ही नेतृत्व करत असाल तर माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे, भाजप देशात ५४ वर गेली तर उद्धव ठाकरे तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो, देशात जाऊद्या पण राज्यात मविआच्या १८ जागा आल्या तर मी राजकारण सोडेल’, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं होते. यावरच संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिले आहे.