VIDEO: गोव्यात एकत्र येण्याची सुबुद्धी काँग्रेसला झाली नाही, Sanjay Raut यांचा टोला
शिवसेनेने अनेक प्रस्ताव देऊनही स्थानिक नेतृत्वाने तो मान्य केला नाही. याविषयी प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, '' गोव्यात एकत्र लढवत नसलो तरीही पुढील वाटचालीत काँग्रेस आणि शिवसेना नक्कीच एकत्र आहेत. गोव्यात सोबत यण्याची सुबुद्धी झाली नाही
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. शिवसेनेने अनेक प्रस्ताव देऊनही स्थानिक नेतृत्वाने तो मान्य केला नाही. याविषयी प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ” गोव्यात एकत्र लढवत नसलो तरीही पुढील वाटचालीत काँग्रेस आणि शिवसेना नक्कीच एकत्र आहेत. गोव्यात सोबत यण्याची सुबुद्धी झाली नाही. पण महाराष्ट्रात आम्ही एकत्र आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही कुणी स्वबळावर लढले तर त्यावर फार टीका करण्याची गरज नाही. तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा तो निर्णय असतो, त्यांच्यावर तो सोपवायचा असतो.”
Latest Videos