VIDEO : Sanjay Raut | परदेशी कंपन्या देशातील प्रमुखांचे फोन ऐकतं असतील तर देशाच्या स्वातंत्र्याला धोका :राऊत

VIDEO : Sanjay Raut | परदेशी कंपन्या देशातील प्रमुखांचे फोन ऐकतं असतील तर देशाच्या स्वातंत्र्याला धोका :राऊत

| Updated on: Jul 19, 2021 | 11:26 AM

परदेशी कंपन्या आणि अॅपकडून काही पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

परदेशी कंपन्या आणि अॅपकडून काही पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका असून पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वत: त्यावर खुलासा केला पाहिजे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

तसेच या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. देशातील राजकारणी, पत्रकार आणि संपादक अशा 1500 हून अधिक लोकांचे फोन टॅप झाल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे परदेशी कंपन्या आणि अॅपने हे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. फोन टॅपिंग झाल्याची काही नावं समोर आली आहेत.