‘बदनामी पुरुषाचीही होते…’, मग आमदार प्रकाश सुर्वे गप्प का? शीतल म्हात्रे प्रकरणी संजय राऊत यांचा थेट सवाल
VIDEO | शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी संजय राऊत यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती, बघा काय उपस्थित केले सवाल?
नवी दिल्ली : शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणावरून शिंदे-भाजप सरकारवर आज जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणात महिलांची बदनामी होत असेल तर पुरुषाचीही बदनामी होतेय. मग आमदार प्रकाश सुर्वे यांची नेमकी भूमिका काय, ते कुठे आहेत, असा सवाल राऊत यांनी केला आहे. मी इथे दिल्लीत आहे. तो व्हिडिओ खरा की खोटा हे आधी शोधा. मग मॉर्फिंग झालंय की अजून काय झालं, त्याचा तपास करा. पुरुष आमदाराची तक्रार आहे का, हेही पहावं लागेल. ते कुठे आहेत? त्यासंदर्भात पुरुषाचीही बदनामी झाली आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
Published on: Mar 14, 2023 04:19 PM
Latest Videos