शिवसेना नेमकी कोणाची? 'या' नेत्याने केला मोठा दावा

शिवसेना नेमकी कोणाची? ‘या’ नेत्याने केला मोठा दावा

| Updated on: Jan 17, 2023 | 2:46 PM

शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. खरी शिवसेना कोणाची आहे हा प्रश्न महाराष्ट्रात तरी उपस्थित होत नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणारी शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

येत्या २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजची सुनावणी सर्वाधिक महत्त्वाची आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरी शिवसेना कोणाची यावर मोठा दावा केला आहे. शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो. खरी शिवसेना कोणाची आहे हा प्रश्न महाराष्ट्रात तरी उपस्थित होत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

खरी शिवसेना कोणाची यावर बोलताना संजय राऊत असे म्हणाले की, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणारी शिवसेनाच खरी शिवसेना आहे. शिवसेना एकच असल्याचे पुन्हा संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

Published on: Jan 17, 2023 02:46 PM