'भाजप-शिंदे गटातील नेत्यांना ओझं, पण या ओझ्याचं भविष्यात करायचं काय?', संजय राऊत यांचा खोचक सवाल

‘भाजप-शिंदे गटातील नेत्यांना ओझं, पण या ओझ्याचं भविष्यात करायचं काय?’, संजय राऊत यांचा खोचक सवाल

| Updated on: Mar 14, 2023 | 3:53 PM

VIDEO | भूषण देसाई यांच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशावर संजय राऊत यांनी लगावला टोला, बघा काय म्हणाले?

नवी दिल्ली : सुभाष देसाई यांचे पुत्र कधीच शिवसेनेत नव्हते आणि ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याने ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, असं संजय राऊत म्हणालेत. तर भूषण देसाई एकनाथ शिंदे गटात कसे गेले, हा प्रश्न सामंत लोणीवाले यांना विचारा. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी भूषण देसाई यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आता भूषण देसाई शिंदे गटात सामील झाले. पण मिंधे गट कधी बाप पळवतात, आता मुलंही पळवायला लागलेत. ही मेगा भरती सुरु आहेत, पण त्याला अर्थ नाही ती कुचकामी असल्याचा टोलाही लगावला आहे. अनेक नेत्यांवर आरोप करायचे आणि त्यानंतर त्यांना भाजपा किंवा शिंदे गटात घ्यायचं, असे सुरु आहेत. पण या ओझ्याचं भविष्यात भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांना खूप ओझं होणार आहे. भविष्यात या ओझ्याचं काय करायचं, वॉशिंग मशीन बिघडेल, इतका कचरा ते आत टाकतायत असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला आहे.