Sanjay Raut LIVE | CBI आणि ED चा राजकीय वापर सुरु – खासदार संजय राऊत
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे मारले गेले आहेत. यावर शिवसेना खासदरा संजय राऊत य़ांनी आपली प्रतिक्रिया दिली असून CBI आणि ED चा राजकीय वापर सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. आधी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर महिनाभरातच ईडीनेही देशमुखांच्या नागपुरातील घरावर धाड टाकली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव कालच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज वाढली आहे.
दरम्यान या सर्वांवर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी CBI आणि ED चा राजकीय वापर सुरु असल्याच म्हणत भाजपावर टीका केली आहे. दरम्यान अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर (Enforcement Case Information Report म्हणजेच ECIR) दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी (शुक्रवारी) पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली.