त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय, या गद्दारांना लोकं रस्त्यावर बांबूचे फटके मारतील; शिंदेंच्या टीकेवर राऊतांचा पलटवार
'सर्वोच्च न्यायलयाने सांगितल्यानुसार, सध्याचे मुख्यमंत्री घटनाबाह्य, बेकायदेशीर आहे. तरीही हे सरकार निर्लज्जपणे मोदी आणि शहांनी महाराष्ट्राच्या बोकांडी बसवलं आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हीच सगळ्यांनी मिळून त्याच्या महायुतीला बांबू घातला आहे. तो अजून निघाला नाही. तो...', संजय राऊतांचा शिंदेंवर पलटवार
भोंगा वाजवणाऱ्या काही लोकांना बांबू लावला पाहिजे. काही लोक असे आहेत की सकाळीच त्यांचा भोंगा वाजतो, एक भोंगा निघाला तर दुसरा चालू झाला असं वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल संजय राऊत यांना खोचक टोला लगावला होता. यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. ‘सर्वोच्च न्यायलयाने सांगितल्यानुसार, सध्याचे मुख्यमंत्री घटनाबाह्य, बेकायदेशीर आहे. तरीही हे सरकार निर्लज्जपणे मोदी आणि शहांनी महाराष्ट्राच्या बोकांडी बसवलं आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हीच सगळ्यांनी मिळून त्याच्या महायुतीला बांबू घातला आहे. तो अजून निघाला नाही. तो काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत, त्यामुळे त्यांना स्वप्नातही बांबू दिसतोय’, अशी घणाघाती टीका करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आणि येत्या विधासभेच्या निवडणुकीत हा बांबू आरपार जाईल हे लिहून घ्या. आणि याच बांबूचे फटके सगळ्या गद्दारांना लोक रस्त्यावर मारतील, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला आहे.