संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेवरून भाजपचा पलटवार, त्यांनी आपल्या औकातीत बोलावं, नाहीतर…
उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरील टीकेवर संजय राऊत यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी जहरी टीका भाजपवर केली आहे. तर संजय राऊत यांच्या टीकेला भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राऊतांनी आपल्या औकातीत बोलालं, नाहीतर हिशोब मांडू…असा इशाराच भाजप नेत्यानं दिला आहे.
भाजपची औकात काय? दिल्ली तुमच्या बापाची आहे का? असा आक्रमक सवाल करत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी औकात काढल्यानंतर भाजपकडून देखील त्यांना उत्तर देण्यात आलं आहे. भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी आपल्या औकातीत बोलावं… नाहीतर त्यांच्या हिशोब मांडू असा थेट इशारा देत प्रवीण देरकर यांनी संजय राऊत यांना दिला आहे. प्रवीण दरेकर यांच्याआधी रावसाहेब दानवे यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. ‘उद्धव ठाकरे यांच्यावर मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांच्या दारात उभं राहण्याची वेळ आली आहे. ‘, असं म्हणत रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती.