भुताटकी, आत्मा, ढोंग, अंधश्रद्धा आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर नाव न घेता हल्लाबोल

भुताटकी, आत्मा, ढोंग, अंधश्रद्धा आणि बरंच काही…, राऊतांचा मोदींवर नाव न घेता हल्लाबोल

| Updated on: Apr 30, 2024 | 1:45 PM

'महाराष्ट्र ढोंग, अंधश्रद्धा, फेकाफेकी, याला कधीही महाराष्ट्रने महत्व दिले नाही. महाराष्ट्र हा पवित्र आत्म्यांचा प्रदेश आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले अशा लोकांचा महाराष्ट्र आहे. काल मोदीजी पुण्यात होते तिथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा साधा उल्लेख तरी केला का?'

जे मराठी माणसाचे, महाराष्ट्रचे शत्रू आहेत. ज्याला महाराष्ट्राने गाडलंय, अशा सगळ्यांचे आत्मे महाराष्ट्रमध्ये साडेचारशे वर्षांपासून भटकत आहेत. त्यात हा नवीन गुजरातचा एक आत्मा आहे, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली. संजय राऊत पुढे असेही म्हणाले की, असे कितीही आत्मे महाराष्ट्रमध्ये भटकत असले आणि त्यांच्याकडून काहीही वक्तव्य होत असली तरी अशा भुताटकीच्या वक्तव्यांना आणि आत्म्यांना महाराष्ट्र जुमानत नाही. महाराष्ट्र ढोंग, अंधश्रद्धा, फेकाफेकी, याला कधीही महाराष्ट्रने महत्व दिले नाही. महाराष्ट्र हा पवित्र आत्म्यांचा प्रदेश आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले अशा लोकांचा महाराष्ट्र आहे. काल मोदीजी पुण्यात होते तिथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा साधा उल्लेख तरी केला का? कारण त्यांना डॉ आंबेडकर यांच्यावर राग आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे त्यांना संविधान बदलायचे आहे. म्हणून त्यांचे आत्मे महाराष्ट्र मध्ये भटकतायत, असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला तर त्याविरोधात शिवसेना ठाम पणे उभी आहे, संविधान आम्ही बदलू देणार नाहीत, असे राऊत म्हणाले.

Published on: Apr 30, 2024 01:45 PM