… तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदींवर पलटवार करत खरपूस समाचार घेतला आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल असं विधान करत असाल तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज आहात, त्याचे संतान आहात अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा नकली संतान असा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदींवर पलटवार करत खरपूस समाचार घेतला आहे. मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांबद्दल मोदींनी दळभद्री वक्तव्य केलं, तो संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असल्याचे राऊत म्हणाले. तर ठाकरेंना नकली संतान म्हणणारेच औरंगजेबाचे संतान असल्याचा हल्लाबोल राऊतांनी केला. मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांना संपूर्ण राज्य मानायचं, लोकं त्यांची पूजा करतात. त्यांच्या मुलाबद्दल असं विधान करणं, शिवसेनेला नकली म्हणणं हा राज्याचा अपमान आहे. तुमची एवढी हिंमत? त्यांना तुम्ही नकली म्हणता ? कोणी बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांचा अपमान करत असेल तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही. तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल असं विधान करत असाल तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज आहात, त्याचे संतान आहात अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.