Sanjay Raut Road Show | तुफान गर्दीत संजय राऊतांचा बेळगावात रोड शो
Sanjay Raut Road Show | तुफान गर्दीत संजय राऊतांचा बेळगावात रोड शो
शिवसेना नेते संजय राऊत आज बेळगावच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचासाराठी ते दाखल झाले आहेत. ते दाखल होण्याआधीच प्रशासनाने त्यांचा भाषणाचा स्टेज तोडल्याची घटना समोर आली. मात्र, तरीही भाषण करणारचं असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे. बेळगावात संध्याकाळी संजय राऊत यांचा रोड शो निघाला. यावेळी कानडी प्रशासनाने वीज घालवली. मात्र, या रोड शोमध्ये सामील झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी टॉच लावत रॅली सुरु ठेवली. यावेळी त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
Latest Videos