Saamna Editorial | पाँच के पच्चीस..., सामनातून दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी

Saamna Editorial | पाँच के पच्चीस…, सामनातून दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी

| Updated on: Oct 12, 2021 | 11:14 AM

सुरनकोटच्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांचे रक्त वाळण्याआधीच या घटनेचा ' पाँच के पच्चीस ' असा जबरदस्त सूड उगवलाच पाहिजे, अशी मागणी आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

जम्मू – कश्मीरचे तमाम विशेष अधिकार काढून घेतल्यानंतर कश्मीरातील पाकिस्तानचे बगलबच्चे अधिकच चेकाळले आहेत. इतर धर्मीयांनी कश्मीरात पाऊलच ठेवू नये या विकृत मानसिकतेतून पाकिस्तानच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या अतिरेक्यांनी कश्मीरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. चारच दिवसांपूर्वी कश्मिरी पंडित असलेल्या शिक्षकाची आणि शीख धर्मीय महिला प्राचार्याची हत्या केल्यानंतर बेभान झालेल्या अतिरेक्यांनी आता लष्कराच्या पाच जवानांचा बळी घेण्याचे धाडस केले आहे. सुरनकोटच्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांचे रक्त वाळण्याआधीच या घटनेचा ‘ पाँच के पच्चीस ‘ असा जबरदस्त सूड उगवलाच पाहिजे, अशी मागणी आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.