अर्णव गोस्वामीकडे पैसे मागायचे नाहीत, किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक यांना धमकी दिल्याची माहिती, संजय राऊतांचा दावा

अर्णव गोस्वामीकडे पैसे मागायचे नाहीत, किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक यांना धमकी दिल्याची माहिती, संजय राऊतांचा दावा

| Updated on: Feb 18, 2022 | 10:14 AM

अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यावर भाजपचे लोक बोलत नाहीत.अन्वय नाईकला ज्याच्यामुळं आत्महत्या लागली त्याच्या समर्थनार्थ हे भाजपचे लोक बोलत होते. अन्वय नाईक यांना किरीट सोमय्यांनी धमकी दिल्याची माझ्याकडे माहिती आहे, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी काल सांगतिलं ते जेलमध्ये जातील, जेलमध्ये जाण्यासाठी ते मार्ग शोधत आहेत. लवकरच जनता त्यांच्या मागे लागेल. जनता मागे ते पुढं अशी स्थिती राहील. मी बंगले दाखवा असं सांगितलं होतं. त्यांची बेनामी संपत्ती असेल ती त्यांना दिसत असेल, असं संजय राऊत म्हणाले. त्यासंदर्भात वारंवार स्पष्टीकरण दिलं आहे. संरपंच यांनी माहिती दिली आहे.  त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक होते. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यावर भाजपचे लोक बोलत नाहीत.अन्वय नाईकला ज्याच्यामुळं आत्महत्या लागली त्याच्या समर्थनार्थ हे भाजपचे लोक बोलत होते. अन्वय नाईक यांना किरीट सोमय्यांनी धमकी दिल्याची माझ्याकडे माहिती आहे. अर्णव गोस्वामीकडे पैसे मागायचे नाहीत, अशी धमकी किरीट सोमय्यांनी दिली. धमकीनंतर अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली. या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबईतून मराठी उद्योजकांना संपवायचं आहे. अन्वय नाईक यांचे हे सर्व गुन्हेगार आहेत. आता एक गुन्हेगार तिथे जात आहे, अस संजय राऊत म्हणाले