गोव्यातील राजकारण प्रस्थापितांच्या हाती गेलं, आम्ही सर्वसामान्यांना उमेदवारी देणार: संजय राऊत

गोव्यातील राजकारण प्रस्थापितांच्या हाती गेलं, आम्ही सर्वसामान्यांना उमेदवारी देणार: संजय राऊत

| Updated on: Jan 16, 2022 | 11:47 AM

उमेदवारांची यादी तयार होते आम्ही निवडणुका लढवू ,18, 19 तारखेला आम्ही पुन्हा एकदा चाललोय तेव्हा उमेदवारांची यादी जाहीर करू, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

एनसीपी सोबत आम्ही महाराष्ट्र आहोत, काँग्रेस सोबत सुद्धा आहे. मात्र, गोव्यात विचारताय तर काँग्रेस सोबत जागा वाटप झालं नाही त्यांची काही मजबुरी असेल आमची काही मजबुरी असेल.  उमेदवारांची यादी तयार होते आम्ही निवडणुका लढवू ,18, 19 तारखेला आम्ही पुन्हा एकदा चाललोय तेव्हा उमेदवारांची यादी जाहीर करू, असं संजय राऊत म्हणाले आहेत. गोव्यातल्या सामान्य लोकांना घेऊन आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात उभा करू, असं संजय राऊत म्हणाले. गोव्याचे राजकारण हे प्रस्थापितांच्या हाती गेलेला आहे. यामध्ये लॅंड माफिया, भ्रष्टाचारी ड्रग्ज माफिया यांच्या हातात राजकारणाची सूत्रे आहेत. हे जर गोव्यात बदलायचे असेल तर आपल्यातल्या सर्वसामान्यांना गोव्यातील लोकांना निवडून आणायला हवं, असं संजय राऊत म्हणाले.