'कायद्यासंदर्भात राज्य सरकार कुठेही नमतं घेत नाही; दिलीप वळसे पाटील निर्णय घेण्यासाठी सक्षम'

‘कायद्यासंदर्भात राज्य सरकार कुठेही नमतं घेत नाही; दिलीप वळसे पाटील निर्णय घेण्यासाठी सक्षम’

| Updated on: Nov 22, 2021 | 1:26 PM

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. हे ठाकरे सरकार आहे, इथं कायदेशीर कारवाई करताना गट तट पक्ष पाहिला जात नाही, असं प्रत्युत्तर राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं.

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. हे ठाकरे सरकार आहे, इथं कायदेशीर कारवाई करताना गट तट पक्ष पाहिला जात नाही, असं प्रत्युत्तर राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं. विरोधी पक्षनेते राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात अमरावतीसारख्या घटना घडू नये म्हणून त्यांनी आगीत तेल न टाकता अशा घटना थांबाव्यात म्हणून काम करायला हवं. महाराष्ट्र हा दंगलीसाठी ओळखला जाऊ नये. हे कायद्याचं राज्य आहे. विदर्भात पुढे 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. कायदा सर्वांना समान आहे. अमरावतीत काय घडलं ते कुणी केलं ते देशाला माहिती आहे. गृहमंत्र्यांना आणि अमरावतीच्या जनतेला माहिती आहे. वातावरण शांत झालं असताना उगाचच कुणी काड्या करण्याचं काम करु नये, असं संजय राऊत म्हणाले.

Published on: Nov 22, 2021 01:24 PM