Sanjay Raut : ईडीची धाड पडताच शिवसैनिकांची राऊतांच्या घराबाहेर घोषणाबाजी; शिवसेनेचं ठिय्या आंदोलन

Sanjay Raut : ईडीची धाड पडताच शिवसैनिकांची राऊतांच्या घराबाहेर घोषणाबाजी; शिवसेनेचं ठिय्या आंदोलन

| Updated on: Jul 31, 2022 | 9:46 AM

ईडीच्या या कारवाईचा विरोध, निषेध करण्यासाठी शिवसैनिक राऊतांच्या घराच्या बाहेर जमण्यास सुरूवाच झालीयं. इतकेच नव्हेतर शिवसैनिकांनी त्याठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यासही सुरूवात केलीयं. दरम्यान, राऊतांच्या अडचणीत वाढ झालीय.

मुंबई :  शिवसैनिक राऊतांच्या घराच्या बाहेर जमण्यास सुरूवाच झालीयं. इतकेच नव्हेतर शिवसैनिकांनी त्याठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यासही सुरूवात केलीयं. कारण आहे शिवसेना संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईचं. शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी आज सकाळी ईडीचे पथक दाखल झाल्यावर एकच गोंधळ उडालायं. विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी अशाप्रकारची कारवाई केली जातंय, असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातोयं. आता ईडीच्या (ED) या कारवाईचा विरोध आणि निषेध करण्यासाठी शिवसैनिक राऊतांच्या घराच्या बाहेर जमण्यास सुरूवाच झालीयं. इतकेच नव्हेतर शिवसैनिकांनी त्याठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यासही सुरूवात केलीयं. शिवसेनेच्या नेत्यांसोबत आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेत्यांच्याही प्रतिक्रिया येण्यास सुरू झालीयं. मात्र, राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यासही सुरूवात केलीयं.

Published on: Jul 31, 2022 09:36 AM