जेव्हा ठाकरे आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच : संजय राऊत

जेव्हा ठाकरे आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच : संजय राऊत

| Updated on: Jun 08, 2021 | 5:13 PM

ठाकरे-मोदी भेटीची चर्चा सुरु झाली असेल तर नक्कीच ती भेट महत्त्वाची आहे, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. या भेटीवरुन राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना एकत्र येणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) भेटतात, तेव्हा ठाकरे- मोदी भेटीची चर्चा तर होणारच, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते. ठाकरे-मोदी भेटीची चर्चा सुरु झाली असेल तर नक्कीच ती भेट महत्त्वाची आहे, असंही संजय राऊत म्हणाले. या भेटीवरुन राज्यात पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना एकत्र येणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्याबाबत विचारलं असता आतमध्ये बैठक सुरु असताना दोन खंबीर शिलेदार बाहेर होते, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. (Sanjay Raut Shiv Sena MP reaction on Maharashtra CM Uddhav Thackeray and PM Narendra Modi meeting)