Sanjay Raut : दर्गावर कारवाई करण्यासाठी मुद्दाम आजचा दिवस निवडला; संजय राऊतांचा आरोप
ShivSena Convention 2025 : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं अधिवेशन पार पडत आहे. मात्र हे अधिवेशन होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
सत्ताधारी आजही शिवसेनेला घाबरतात. शिवसेनेची दहशत आहे. म्हणूनच शिवसेनेचे अधिवेशन होऊ नये, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, असा आरोप उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेना अधिवेशन आणि नाशिकच्या काठे गल्लीतील अनधिकृत दर्गावरील तोडक कारवाईवर भाष्य केलं.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आज नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व महत्त्वाचे नेते आहेत. त्यात दर्गावर कारवाई करण्यासाठी भाजप आणि सत्ताधारी पक्षाने मुद्दाम आजचाच दिवस निवडला. शिवसेनेचे अधिवेशन होऊ नये, असं त्यांना वाटतं. त्यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केले. शिवसेनेच्या आजच्या शिबिरावरून लक्ष हटवण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली आहे. हिम्मत असेल तर समोर येऊन लढा, त्यासाठी आमची तयारी आहे. मात्र त्यांना देश तोडायचा आहे, वातावरण खराब करायचं आहे, असा आरोप यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केला आहे.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले

नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर

पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू

पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
