‘आमच्यात सारं आलबेल, संजय राऊत यांनी नाक खुपसू नये’, भाजप नेत्याचा इशारा
VIDEO | शिवसेना-फडणवीस सरकारमध्ये संजय राऊत यांनी नाक खुपसू नये, भाजपच्या 'या' नेत्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा
नवी दिल्ली : भाजप आणि शिवसेनेत काही अलबेल नसल्याचा दावा सामना या वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. यावरून भाजप नेते, खासदार अनिल बोंडे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. सामनातील अग्रलेखाचे लेखन करणाऱ्यांनी, संजय राऊत यांनी पालघरमध्ये झालेली शिंदे -फडणवीस यांची सभा पाहिली नसेल. त्या सभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सरकारमध्ये सारं काही अलबेल असल्याचे जनतेला सांगितले. इतकच नाही तर सरकारकडून राज्याच्या विकासही होत आहे. शासन जनतेच्या दारात पोहोचतंय. शिंदे स्वतःहा म्हणाले, हमारा फेव्हिकॉल का मजबूत जोड है…त्यामुळे संजय राऊत यांनी या फेव्हिकॉल का मजबूत जोडमध्ये नाक खुपसू नये, नाहीतर त्यांच्या नाकपुड्या बंद होतील आणि ते गुदमरून मरतील,असे म्हणत अनिल बोंडे यांनी संडय राऊत यांनी जोरदार टीकास्त्र सोडलंय.
Published on: Jun 16, 2023 02:08 PM
Latest Videos