कोणी खुर्ची देता का खुर्ची, अशी देवेंद्र फडणवीस यांची अवस्था : संजय राऊत यांचं प्रत्युत्तर

कोणी खुर्ची देता का खुर्ची, अशी देवेंद्र फडणवीस यांची अवस्था : संजय राऊत यांचं प्रत्युत्तर

| Updated on: Jan 20, 2022 | 11:55 AM

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही महाराष्ट्राच्या रगंभूमीचे उपासक आहोत. देवेंद्र फडणवीस यांची नटसम्राट नाटकातील संवाद घर देता घर असा आहे त्याप्रमाणं खुर्ची देता का खुर्ची झाल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमा भागातील मतदार संघात आम्ही निवडणूक लढणार आहोत. राष्ट्रवादी आणि आमच्यामध्ये कोणतेही वाद नाहीत. प्रफुल पटेल आणि आम्ही बसून ते विषय सोडवले आहेत. गोव्यातील चित्र आपण पाहिलं असेल धुसर आणि अस्पष्ट आहे. प्रत्येक राजकीय पक्षानं गोव्याची राजकीय प्रयोगशाळा केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री, तृणमुल काँग्रेस इथं बसलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा तंबू देखील गोव्यात पडलेला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही महाराष्ट्राच्या रगंभूमीचे उपासक आहोत. देवेंद्र फडणवीस यांची नटसम्राट नाटकातील संवाद घर देता घर असा आहे त्याप्रमाणं खुर्ची देता का खुर्ची झाल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.