काही राजकीय पक्षांना जनतेमध्ये बेस नाही, दहीहंडीवरुन संजय राऊतांची मनसेवर अप्रत्यक्ष टीका

काही राजकीय पक्षांना जनतेमध्ये बेस नाही, दहीहंडीवरुन संजय राऊतांची मनसेवर अप्रत्यक्ष टीका

| Updated on: Aug 31, 2021 | 12:44 PM

केरळला थोडी सूट दिली आणि तिसरी लाट सुरु झाली. महाराष्ट्र सरकार टप्प्यानं सूट देत आहोत. काही राजकीय पक्षांना जनतेमध्ये बेस नाही ते आज अशा गोष्टी करत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय.

भाजपचे नेते सोशल मीडियावर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची यादी जाहीर करत आहेत. त्यांना ईडी बोलावणार त्यामुळे भाजपचे समन्स आहे की ईडीचे आहे हे समजलं पाहिजे. भाजपच्या नेत्यांनी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची यादी जाहीर केली त्या क्रमानं त्यांना बोलावणार असा दावा करतात. अनिल परब यांना समन्स आलेलं आहे. मात्र, ते आज जाणार नाहीत. सीबीआय आणि ईडी काय करत आहेत. कुणावर कारवाई होणार हे भाजपच्या सोशल मीडियावर यादी जाहीर करतात यामुळे ईडीला भाजप चालवत आहे का? असा सवाल देशातल्या लोकांमध्ये उपस्थित झाला आहे. आम्हाला फक्त डिफेन्स खात्याचं रडार माहिती आहे. तिथं देशाच्या दुश्मनांची माहिती ठेवली जात. ईडीला आम्ही देशाचे दुश्मन वाटत असू तर आमच्यावर रडार लावा, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

केरळला थोडी सूट दिली आणि तिसरी लाट सुरु झाली. महाराष्ट्र सरकार टप्प्यानं सूट देत आहोत. काही राजकीय पक्षांना जनतेमध्ये बेस नाही ते आज अशा गोष्टी करत आहे. केंद्रानं बंधन घातलं आहे. केंद्र सरकारनं सणांच्या काळात निर्बंध ठेवण्याच्या सूचना दिल्यात हे त्यांना कळत नाही. दहीहंडी आणि गणेशोत्सवात महाराष्ट्र सरकारनं काळजी घेण्याची गरज आहे. महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केलं जातेय त्यांच्यावर केंद्र सरकार कारवाई करणार का? आम्ही कारवाई केली तर आम्हाला हिंदुत्त्वविरोधी म्हणून टीका केली जाते. केंद्रानं दिलेल्या मार्गदर्शक सूचना अमित शाह यांच्या मंत्रालयाच्या आहेत. त्यांना हिंदुत्तविरोधी म्हणणार का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.